ट्रम्प यांच्या वकिलाकडे अदानींचा खटला; सुटकेच्या बदल्यात अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव, न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत 265 मिलियन डॉलर लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अदानीच्या वतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी वकील रॉबर्ट जे. गियुफ्रा ज्युनियर हे न्यायालयात युक्तीवाद करणार आहेत. दरम्यान अदानी हे त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचा प्रस्ताव देणार असल्याचे देखील समजते.

वकील रॉबर्ट जे. गियुफ्रा ज्युनियर यांनी नुकतीच या प्रकरणात एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 100 स्लाईडचे एक प्रेझेंटेशन सादर केले. या प्रेझेंटेशनमध्ये गौतम अदानींवरील आरोप कोर्टाने रद्द केले तर त्या बदल्यात अदानी अमेरिकेत 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील. त्यामुळे तब्बल 15 हजार नोकऱ्या तयार होतील असा प्रस्ताव देण्यात येणार आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.