सरकारची दडपशाही; विनायक राऊत, हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टींसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची मुंबईत धडक
अवकाळी पाऊस, कडाक्याचं ऊन आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या या विदारक स्थितीकडे पाहायला सरकारला वेळ नाही. सरकारच्या या बेजबाबदारपणाच्या निषेधार्थ आणि नुकसानभरपाईसाठी कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर शुक्रवारी मोर्चा काढणार होते. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा हा मोर्चा निघणार होता. मात्र हा मोर्चा निघण्यापूर्वीच सरकारने दडपशाही करत आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना ताब्यात घेतले. यावेळी नरिमन पॉइंट येथील ‘शिवालय’ जवळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
बातमी अपडेट होत आहे…3
कोकणातील आंबा, काजू बागायतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक दिली. या आंदोलनासाठी गिरगाव चौपाटी आलेल्या बागायतदारांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेले. pic.twitter.com/2VwT6K14X5
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) १५ मे २०२६
Comments are closed.