‘जेलर-2’च्या सेटवर विजेच्या धक्क्याने मृत्यू
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी तामीळ चित्रपट ‘जेलर-2’च्या सेटवर विजेचा धक्का लागून एका कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चेन्नईमधील ईस्ट कोस्ट रोडवर पनैयूर येथील आदित्यराम फिल्म सिटीच्या एका सेटवर घडला. 28 वर्षीय कार्तिकेयन चित्रपटाच्या शूटिंगसाठी घरासारखा सेट तयार करण्याचे काम करत होता. यावेळी विजेचा धक्का लागल्याने कार्तिकेयनचा मृत्यू झाला.
Comments are closed.