शक्तीमान मधील काळी मांजर आठवते? पुढे हि बनली बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री – Tezzbuzz
80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. याबरोबरच त्या काळात अनेक मालिका आल्या आणि गेल्या, पण 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या मुलांच्या आवडत्या सुपरहिरो शो ‘शक्तीमान’ची लोकप्रियता आजही सांगितली जाते.
'शक्तीमान (shaktiman)हा शो इतका गाजला की आज ही ती कहानी लहान मुलं विसरु शकली नाहीत, तसेच त्यातील कलाकार ही तितकेच गाजले आज ही त्या कलाकाराबाबत प्रेक्षक जाणुन घेण्याबाबत उत्सुक असतात. मुकेश खन्ना यांची गंगाधर आणि शक्तीमान ही दुहेरी भूमिका असो, किंवा सुरेंद्र पाल यांनी साकारलेला निर्दयी खलनायक ‘तामराज किल्विश’ असो, या शोमध्ये एक रहस्यमय आणि भयानक पात्रही होते, जे नेहमी काळ्या मांजरीच्या वेशात दिसायचे. पण या मुखवट्यामागील अभिनेत्री कोण का, ती आता बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील एक प्रसिद्ध कलाकार बनली आहे.
मुखवट्यामागे आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात करणाऱ्या या हुशार अभिनेत्रीने ‘शक्तीमान’नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी कोणी नसून अश्विनी कळसेकर आहे. अश्विनी कळसेकर यांचे व्यावसायिक आयुष्य त्यांच्या वैयक्तिक आयुष्याइतकेच तेजस्वी आणि यशस्वी होते. त्यांच्या आयुष्यातही तितकेच चढ-उतार होते. त्यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न प्रसिद्ध दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेते नितेश पांडे यांच्याशी झाले होते. पण हे नाते कलांतराने संपले. काही काळानंतर अश्विनीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा मार्ग सापडला. त्यांनी भारतीय आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक आणि एक उत्कृष्ट सहकलाकार मुरली शर्मा यांच्याशी लग्न केले. आणि ते आज आंनदाने जीवन जगत आहेत.
Comments are closed.