आता कुठे आहेत ‘महाभारत’मधील दुःशासन? द्रौपदी चीरहरणच्या सीननंतर प्रेक्षकांच्या रोषाला जावे लागले होते सामोरे – Tezzbuzz

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे काही आता वयस्कर झाले आहेत. असाच महाभारत मधील या पौराणिक मालिकेतील प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे. या मालिकेतील सर्वात धक्कादायक आणि प्रसिद्ध दृश्य म्हणजे ‘द्रौपदीचे चीरहरण’, ज्याने त्या काळी लोकांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. दुःशासनाची ही भुमिका ही गाजली होती.

पडद्यावर दुःशासनाची ही अत्यंत आव्हानात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारणारे दमदार अभिनेते म्हणजे विनोद कपूर. विनोद कपूर यांनी ही भूमिका इतक्या तीव्रतेने साकारली की, लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही एक खरा खलनायक मानू लागले. त्याच्या या भयानक अभिनयामुळे लोकही त्याच प्रकारे त्यांना मानत या वरुन हे लक्षात येते की, त्यानी या पात्राला पुर्ण पणे न्याय दिला आहे.

विनोद (vinod)कपूर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1987 मध्ये ‘उत्तर दक्षिण’ आणि त्यानंतर 1988 मध्ये ‘ये प्यार नहीं’ या चित्रपटांमधून केली, पण त्यांना खरी आणि महत्त्वपूर्ण ओळख ‘महाभारत’मुळे मिळाली. त्यानंतर त्यांना अनेक कामे मिळत गेली. तसेच त्यांनी रामायन मध्येही भुमिका केल्या. विनोद कपूर आता प्रसिद्धीपासून दूर राहूनही,  एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून काम करत आहेत आणि एक प्रतिष्ठित जीवन जगत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

शक्तीमान मधील काळी मांजर आठवते? पुढे हि बनली बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री

Comments are closed.