इराण युद्ध थांबवायला हवे! पुतीन शी जिनपिंगना भेटले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धासंदर्भात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी इशारा दिला आहे. जग पुन्हा जंगलराजच्या दिशेने जात आहे. हे युद्ध न थांबल्यास आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि स्थैर्यावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे हे युद्ध थांबवणे खूप आवश्यक आहे, असे जिनपिंग म्हणाले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांची भेट घेतल्यानंतर जिनपिंग यांनी हा इशारा दिला.

पुतीन-जिनपिंग यांच्यात द्वीपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन दिले. त्यावेळी जगातून दबावाचे राजकारण हद्दपार व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बैठकीत जागतिक राजकारण, इराण युद्ध इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा झाली.  एकतर्फी लष्करी कारवाई आणि दीर्घकालीन युद्ध जगाला कमपुवत बनवेल, असे जिनपिंग यावेळी म्हणाले.

Comments are closed.