सोन्याच्या किमती गगनाला भिडताच ‘गोल्ड लोन’ची वाढली क्रेझ, ‘हे’ राज्य आहे टॉपवर, पाहा संपूर्ण या

सुवर्ण कर्ज: गोल्ड लोनच्या बाबतीत देशाच्या बँकिंग क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आकडेवारी समोर आली आहे. भारताच्या एकूण गोल्ड लोन (Gold Loan News) पोर्टफोलिओमध्ये वार्षिक ५० टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशातील या एकूण थकीत कर्जापैकी एकटा ७५ टक्के हिस्सा फक्त दक्षिण भारतातील पाच राज्यांच्या नावावर आहे.(Gold Loan News)

Gold Loan : दक्षिण भारतीय राज्ये सर्वात पुढे

क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ‘CRIF हाय मार्क’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ पर्यंत बँका आणि एनबीएफसी (NBFC) कडून घेतलेल्या एकूण १८.६ लाख कोटी रुपयांच्या गोल्ड लोनपैकी, दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये – तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ तब्बल १३.९४ लाख कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.

अहवालानुसार, मार्च २०२६ पर्यंत तामिळनाडू ५.९६ लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जासह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेश ३.०८ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या, कर्नाटक १.८१ लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या, तेलंगणा १.६० लाख कोटी रुपयांसह चौथ्या आणि केरल १.४५ लाख कोटी रुपयांच्या थकीत गोल्ड लोनसह अनुक्रमे पाचव्या क्रमांकावर आहे. सोन्याच्या वाढत्या किमती, कर्जाची वाढती मागणी आणि सुरक्षित कर्ज (Secured Loan) घेण्याकडे लोकांचा वाढलेला कल यामुळे या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सोन्याबद्दल असलेले सांस्कृतिक आकर्षण आणि मजबूत बँकिंग नेटवर्क यामुळे दक्षिण भारत या कर्जाचा मुख्य भाग बनला आहे.

Gold Loan : इतर राज्यांची काय आहे स्थिती?

देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य असूनही उत्तर प्रदेशात गोल्ड लोनचे थकीत कर्ज केवळ ४२,३०० कोटी रुपये आहे. इतर मोठ्या राज्यांची आकडेवारी देखील या तुलनेत खूपच कमी आहे, पश्चिम बंगालमध्ये ३५,००० कोटी रुपये, राजस्थानमध्ये ४१,७०० कोटी रुपये आणि गुजरातमध्ये ५७,१०० कोटी रुपयांचे गोल्ड लोन थकीत आहे. मार्च २०२६ मधील वाढीचा (Growth) विचार केल्यास दक्षिण भारतातील राज्ये आघाडीवर राहिली, कर्नाटक (१०.५%), तेलंगणा (१२.८%) आणि त्यानंतर उत्तर प्रदेश (११.२%).

Gold Loan : इतर कर्ज प्रकारांमध्ये कोण पुढे?

CRIF हाय मार्कच्या रिपोर्टनुसार, गोल्ड लोन क्षेत्रात ‘ॲसेट क्वालिटी’मध्ये (कर्ज वसुलीची स्थिती) सुधारणा झाली आहे. मार्च २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत २.५ लाख ते ५ लाख रुपयांच्या मोठ्या लोन सेगमेंटमध्ये कर्ज बुडवण्याचे (Default) प्रमाण थेट निम्म्यावर आले आहे. म्हणजेच मोठ्या रकमेच्या कर्जाच्या बदल्यात ठेवलेले सोने (तारण) अधिक मजबूत स्थितीत आहे. रिपोर्टनुसार, पर्सनल लोनमध्ये (वैयक्तिक कर्ज) वार्षिक १२.९% ची चांगली वाढ नोंदवली गेली. हे दर्शवते की, कर्ज देण्याचे नियम कडक होऊनही अनसिक्योर्ड रिटेल क्रेडिटीची (विना तारण कर्ज) मागणी बाजारात कायम आहे.

इतर क्षेत्रांचा विचार केल्यास, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या खरेदीत वाढ झाल्यामुळे कंझ्युमर ड्युरेबल लोनमध्ये २०.८% ची मोठी वाढ झाली आहे. वाहन कर्जात (Vehicle Financing) देखील सातत्याने तेजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये वार्षिक १३.९% ते १५.१% दरम्यान वाढ झाली आहे. दुसरीकडे, घरांची मागणी आणि प्रॉपर्टी मार्केटमधील घडामोडींमुळे होम लोन (गृहकर्ज) क्षेत्रात ९.४% ची स्थिर वाढ कायम आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.