Ratnagiri News – आंबा घाटात भयंकर अपघात! एसटी आणि कारची समोरासमोर भीषण धडक, 5 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात आज (21 मे 2026) सकाळी एक भीषण अपघात झाला. घाटातील दक्खन बस थांब्याजवळ एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 5 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय 50, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस घेऊन खडीकोळवण ते साखरपा अशी जात होते. दरम्यान, बस आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ आली असता, समोरून येणाऱ्या कारने बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. कारचालक संतोष शिवाजी पवार (वय 50, रा. रामनगर, सातारा) हे आपल्या कारमधून रत्नागिरीहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सदर अपघात साधारण सकाळी 9 वाजून ते 10 च्या दरम्यान घडला आहे.

​या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांमधील एकूण ५ जण जखमी झाले आहेत. एसटी बस चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे आणि प्रवासी संजय तुकाराम शितप हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. तर कार चालक संतोष शिवाजी पवार, प्रवासी शंभुराज शिवाजी पवार आणि श्रीकांत लक्ष्मण मानपुरी ये तिघे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना गाड्यांमधून सुखरूप बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी साखरपा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Comments are closed.