गावदेवी मार्केटच्या आगडोंबाची सखोल चौकशी करा, शिवसेना नेते राजन विचारे यांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गावदेवी भाजी मंडईमध्ये मध्यरात्री झालेल्या आगडोंबाची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही आग कशामुळे लागली? की कोणी मुद्दामून लावली? याचा तपास करण्यात यावा असेही विचारे यांनी आज स्पष्ट केले.

गावदेवी भाजी मंडईत जाऊन राजन विचारे यांनी पाहणी केली. तसेच मृत कुटुंबियांच्या मागे शिवसेना खंभीरपणे उभी असल्याचे सांगत रुग्णालयात जाऊन या घटनेतील जखमींची विचारपूस केली. धर्मवीर आनंद दिघे यांनी मोठय़ा संघर्षातून गावदेवी भाजी मंडई उभी केली. मात्र त्यानंतरही मूळ गाळेधारकांना टॅक्स लावला नसल्याची खंत विचारे यांनी व्यक्त केली. दरम्यान, गावदेवी इमारतीला लागलेली आग आणि त्यात पालिकेच्या दोन कर्मचाऱयांचा झालेला मृत्यू ही अत्यंत शरमेची बाब असल्याची टीका विचारे यांनी केली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Comments are closed.