चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात चार महिला ठार
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही जंगलात वाघाने हल्ला करीत चार महिलांचा बळी घेतलाय. तेंदुपत्ता संकलनासाठी या महिला लगतच्या जंगलात गेल्या होत्या. तेंदुपत्ता तोडत असतानाच वाघाने हल्ला चढवला. वाघाने चारही महिलांवर हल्ला करीत त्यांना ठार केले. वन पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
गुंजेवाही जवळच्या गावातील १३ महिला या एकत्र तेंदुपत्ता तोडायाला गेलेल्या. त्यावेळी ही घटना घडली. या हल्ल्यात कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36), सुनीता कौशिक मोहुर्ले (33) या मृत्युमुखी पडल्या आहेत.
Comments are closed.