Chandrapur- वाघाच्या हल्ल्यात चार महिला ठार, तेंदूपत्ता तोडताना अचानक हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही जंगलात वाघाने हल्ला करीत चार महिलांचा बळी घेतला आहे. तेंदुपत्ता संकलनासाठी या महिला लगतच्या जंगलात गेल्या होत्या. तेंदू पाने तोडत असतानाच वाघाने हल्ला चढवला. या सर्व महिला जवळजवळ होत्या. त्यामुळे वाघाने चारही महिलांवर हल्ला करत त्यांना ठार केले. आजवरच्या इतिहासातील ही पहिली घटना असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वन पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

तेंदूपत्ता तोडायला १३ महिला गेल्या होत्या. या महिलांवर वाघाने हल्ला. वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या चार महिलांची नावे कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36), सुनीता कौशिक मोहुर्ले (33)ल अशी आहेत.

Comments are closed.