या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी 3 वेळा बदलली बॉडी; पहलवानाचा लूक पाहून चाहतेही झाले थक्क – Tezzbuzz

राम चरण हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपटे केली आहेत आणि तसेच ती गाजली देखील आहेत. तर आता तो एका त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर हा आगामी चित्रपट म्हणजे ‘पेड्डी’. 4 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच एक टीझर प्रदर्शित झाला असून, त्यात राम चरणच्या पात्राची झलक पाहायला मिळत आहे. टीझर प्रदर्शित होताच त्याच्या चाहत्यानी खुप कौतुक केले आहे.

‘पेड्डी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राम चरणने एक जबरदस्त शरीरयष्टी कमावली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, हे परिवर्तन सोपे नव्हते, असे खुद्द अभिनेत्याने आता उघड केले आहे. ‘पेड्डी’च्या भूमिकेसाठी राम चरणने आधी क्रिकेटपटूच्या, मग कबड्डीपटूच्या भूमिकेची तयारी केली आणि अखेरीस त्यासाठी त्याने पैलवानासारखी धिप्पाड शरीरयष्टी घडवली आहे.

हैदराबादमध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात राम टप्पा (charan)म्हणाला, “हे पात्र साकारण्यासाठी मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. हा फिटनेसचा प्रवास अजिबात सोपा नव्हता आणि दिग्दर्शकाने मला खूप त्रास सहन करताना पाहिले. सर्वात आधी, मला क्रिकेटपटूसारखी सडपातळ शरीरयष्टी तयार करावी लागली. त्यानंतर, भूमिकेसाठी मला कबड्डीपटूसारखी पिळदार, त्यानंतर, मला पैलवानासारखी धिप्पाड शरीरयष्टी तयार करावी लागली. तर या चित्रपटासाठी हे गरजेचे होते. पण हे माझ्यासाठी खुप आव्हनात्मक राहिले.

थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला हा चित्रपट Ott वर ठरला सुपरहिट, 200 दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य

Comments are closed.