अंशुल कंबोजचा नकोसा विक्रम: आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज!
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजसाठी आयपीएल 2026 हा सीझन एखाद्या दुःस्वप्नासारखा ठरला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात कंबोजने 4 षटकांत तब्बल 56 धावा दिल्या आणि केवळ 1 विकेट मिळवली. या सामन्यात त्याने 4 षटकार खाल्ले, ज्यामुळे तो एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंशुल कंबोजने संपूर्ण आयपीएल 2026 मध्ये 14 सामन्यांत 530 धावा खर्च केल्या असून 21 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याच्या गोलंदाजीवर तब्बल 34 षटकार ठोकले गेले आहेत. त्यामुळे तो एका आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज ठरला आहे.
याआधी हा नकोसा विक्रम गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या नावावर होता, ज्याने खाल्ले 2025 मध्ये 33 षटकार स्वीकारले होते. मात्र आता अंशुल कंबोजने हा विक्रम मोडीत काढला आहे.
एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज:
अंशुल कंबोज – 34 षटकार (आयपीएल 2026)
राशिद खान – 33 षटकार (आयपीएल 2025)
मोहम्मद सिराज – 31 षटकार (आयपीएल 2022)
कागिसो रबाडा – 31 षटके (IPL 2026)
वानिंदू हसरंगा – 30 षटकार (आयपीएल 2022)
युझवेंद्र चहल – ३० षटके (IPL 2024)
अंशुल कंबोजसाठी हा सीझन केवळ आकड्यांच्या दृष्टीनेच नाही तर करिअरच्या दृष्टीनेही निराशाजनक ठरला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याने आतापर्यंत एकमेव कसोटी सामना खेळला असून त्यात त्याला फक्त एक विकेट मिळाली आहे.
सीएसके चाहत्यांसाठी हा एक चिंतेचा विषय ठरत असून पुढील सीझनमध्ये कंबोज पुनरागमन करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.