Pressure Cooker Mistakes: या चुकांमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा स्फोट
प्रेशर कुकरमुळे डाळ, भात असो वा भाजी स्वयंपाक अत्यंत कमी वेळात आणि झटपट होतो. पण हाच कुकर वापरताना जर निष्काळजीपणा दाखवला तर तो एका मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. अशा अनेक घटना घडल्याचं आपण कायम ऐकतो. कुकर वापरणे जितके फायद्याचं आहे तितकंच जोखमीचे सुद्धा आहे. परंतू तुम्ही थोडीशी सतर्कता बाळगली तर सहजपणे हे अपघात टाळू शकता. आज आपण कोणत्या चुकांमुळे प्रेशर कुकरचा स्फोट होतो हे जाणून घेऊयात.
क्षमतेपेक्षा जास्त
कुकर कधीही काठापर्यंत भरू नये कारण अन्न शिजताना पदार्थ फुगतात. त्यामुळे वाफेला फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही आणि दाब वाढून स्फोट होतो.
टीप – कुकर नेहमी एकूण क्षमतेच्या 2/3 भागच भरावा.
व्हेंट पाईप ब्लॉक होणे
कुकरची शिट्टी किंवा ज्या नळीवर शिट्टी असते त्या व्हेंट पाईपमध्ये अन्नाचे कण अडकल्यास वाफ बाहेर पडू शकत नाही आणि स्फोट होतो.
हेही वाचा – Fire Safety Gadgets: उन्हाळ्यात घराला द्या फायर सेफ्टी कवच
टीप – कुकर लावताना ही नळी स्वच्छ आहे का नाही याची खात्री करावी.
सेफ्टी व्हॉल्व्ह खराब होणे
कुकरच्या झाकणावर एक व्हॉल्व्ह असतो. शिट्टी न झाल्यास कुकरमधील दाब बाहेर काढण्याचे काम हा व्हॉल्व्ह करतो. व्हॉल्व्ह खराब असेल किंवा धूळ-कचऱ्यामुळे ब्लॉक झाला असेल तर कुकर फुटू शकतो.
टीप – वर्षातून एकदा हा सेफ्टी व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक असते.
जबरदस्तीने झाकण उघडणे
अनेकदा कुकरची वाफ पूर्णपणे न निघताच शिट्टी वर करून किंवा जबरदस्तीने झाकण उघडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आतल्या गरम वाफेच्या दबावामुळे झाकण उडून थेट तोंडावर किंवा अंगावर येऊ शकते.
टीप – गॅस बंद केल्यानंतर कुकर स्वतःहून थंड होऊ द्या. वाफ पूर्णपणे निघून गेल्यावरचं झाकण उघडावं.
सेल रबर
कुकरच्या झाकणाचे रबर सैल असेल किंवा तडकले असेल तर त्यातून वाफ बाहेर पडू शकते. यामुळे योग्य दाब तयार होत नाही आणि झाकण उडून स्फोट होतो.
टीप – कुकरचे रबर सैल वाटू लागल्यास ते ताबडतोब बदला. दर 6 महिन्यांनी रबर बदलणे सुरक्षित आहे.
हेही वाचा – Quantity Of Food : रोजच्या जेवणाचं परफेक्ट माप कसं ठरवायचं?
Comments are closed.