‘मुलाच्या लग्नाला गेलो, तर मला मारून टाकतील’; डोनाल्ड ट्रम्प यांची टिपण्णी, ‘इराण’ प्रश्नामुळे समारंभात सहभागी होण्यास अडचण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते त्यांचे मोठे सुपुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या लग्नाला जाणे टाळू शकतात; तसेच आपण या कार्यक्रमाला गेलो किंवा नाही गेलो, तरी आपल्याला ‘मारून टाकले जाईल’, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

ओव्हल ऑफिसमधील एका संभाषणादरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आपण लग्नाला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सध्याची इराणची परिस्थिती आणि मीडियाकडून होणारी टीका पाहता ही वेळ योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

‘त्याची इच्छा आहे की मी यावे… पण माझ्यासाठी ही वेळ योग्य नाही. माझ्यासमोर ‘इराण’ नावाची एक गोष्ट आहे… जर मी लग्नाला गेलो तर, मला मारून टाकतील. जर मी नाही गेलो, तरी मला मारून टाकतील. अर्थातच, खोट्या बातम्या देणाऱ्या मीडियाकडून’, असे ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (वय ४८ वर्षे) हे या वीकेंडला (शनिवार-रविवार) बहामास येथे एका खासगी समारंभात मॉडेल बेटिना अँडरसन हिच्याशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात विचारले असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, या घरगुती कार्यक्रमासाठी पाहुण्यांची यादी मुद्दामहून मर्यादित ठेवण्यात आली असून, फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासाशी संबंधित सुरक्षेच्या कारणांमुळे आपले उपस्थित राहणे अनिश्चित असल्याचे ट्रम्प यांनी सूचित केले.

आपण लग्नाला गेलो किंवा नाही गेलो, तरी मीडियाकडून होणाऱ्या संभाव्य टीकेचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, ‘ही अशी परिस्थिती आहे की मी कोणत्याही बाजूने जिंकू शकत नाही.’

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी डिसेंबरमध्ये व्हाईट हाऊसच्या एका पार्टीदरम्यान अँडरसनसोबत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. मेरीलँडमधील राष्ट्राध्यक्षांचे विश्रामगृह असलेल्या ‘कॅम्प डेव्हिड’ येथे या जोडप्याचा साखरपुडा झाला असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अँडरसनने ट्रम्प यांच्या पाम बीच येथील ‘मार-ए-लागो’ इस्टेटमध्ये ‘ब्राइडल शॉवर’ आयोजन करण्यात आले होते.

हा आगामी विवाह सोहळा ट्रम्प ज्युनियर यांचे दुसरे लग्न असेल. यापूर्वी त्यांचे वनेसा यांच्याशी लग्न झाले होते आणि २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट होण्यापूर्वी त्यांना पाच मुले आहेत. वनेसा यांना नुकतेच स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले असल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.