प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक मेल-एक्सप्रेस सीएसएमटीऐवजी दादर, ठाण्यातून सुटणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 16 आणि 17 विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक मेल-एक्सप्रेस दादर, ठाण्यातून सोडण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने काही मेल/एक्स्प्रेस गाड्या 10 दिवसांसाठी दादर आणि ठाणेपर्यंतच थांबे देण्यात येणार आहेत.
या ब्लॉक कालावधीत फलाट क्रमांक 16 आणि 17 वर पायाभूत कामे आणि इतर आवश्यक कामे केली जातील. त्यानुसार, 29 मे 2026 पासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या कालावधीसाठी काही अप मेल/एक्स्प्रेस गाड्या शॉर्ट टर्म चालवण्यात येतील.
गाडी क्र. 12112 अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. 11002 बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, गाडी क्र. 12810 हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. 11020 भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्र. 22144 बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. 22108 लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. 22120 मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस या गाड्या दादर येथे थांबवण्यात येतील. तर गाडी क्र. 12134 मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे येथे थांबवण्यात येईल. प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.