मुंबई एनसीबीचा मुंबईत मोठा धाड; 702 किलो गांजा जप्त, दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (NCB) मुंबई विभागीय युनिटने आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया येथून एका ट्रकमधून ७०२ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती शुक्रवारी एका अधिकृत पत्रकाद्वारे देण्यात आली. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या एका माहितीच्या आधारे कारवाई करत, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी २१ मे रोजी महाराष्ट्र पासिंगचा एक ट्रक अडवला आणि याप्रकरणी प्रकाश एमडी आणि पदमलाल एनएम या दोघांना अटक केली. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, “ट्रकच्या झडतीदरम्यान १०० पाकिटांमध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला गांजा सापडला. हा साठा डिटर्जंट, टूथपेस्ट आणि हेअर डाय यांसारख्या किराणा मालाच्या साहित्यात मिसळून लपवण्यात आला होता.”

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, हा अमली पदार्थांचा साठा नागपूर, गोंदिया, पुणे आणि मुंबईतील महाराष्ट्रातील विविध ड्रग्ज सिंडिकेट्ससाठी पाठवला जात होता. “अटक करण्यात आलेले आरोपी ओडिशामधून मोठ्या प्रमाणात गांजा आणून तो नियमितपणे महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम करत होते,” असे एनसीबीने म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपासणी सुरू आहे.

Comments are closed.