IPL 2026 – चेन्नईला पराभवानंतर दंडाचा फटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा अक्षरशः डबल धुव्वा उडाला. गुजरात टायटन्सने आधी 89 धावांनी चिरडलं आणि त्यानंतर स्लो ओव्हररेटमुळे कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या खिशालाही जबरदस्त फटका बसला. आयपीएलने गायकवाडवर तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला, तर प्लेइंग इलेव्हनमधील आणि इम्पॅक्ट प्लेअरमधील प्रत्येकावर सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के इतका दंड ठोकण्यात आला आहे. हा सामना चेन्नईला चांगलाच महागात पडला.

चेन्नईचा मोसमातील दुसरा स्लो ओव्हररेट गुन्हा ठरला. त्यामुळे आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत ही मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पहिला गुन्हा 18 व्या सामन्यात झाला होता आणि आता दुसऱ्यांदा पकडल्याने सीएसकेला मोठी किंमत मोजावी लागली. गुरुवारच्या सामन्यात गुजरातची फलंदाजी म्हणजे धावांचा तुफानी शो होता. शुभमन गिल, साई सुदर्शनने झंझावाती अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली, तर जोस बटलरने नाबाद 57 धावा फटकावत गुजरातला 229 धावांपर्यंत नेलं.

Comments are closed.