कॉक्रोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेम
झुरळ जनता पक्ष: गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये संपूर्ण सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांच्या कॉक्रोच जनता पार्टीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे (Cockroach Janata Party) अधिकृत संकतेस्थळ बंद केले आहे. या संकेतस्थळावर येऊन कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आधी कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट आणि नंतर इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले होते. एक्स आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉक्रोच जनता पार्टीला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही समाज माध्यमांवर कॉक्रोच जनता पार्टीचे लाखो सदस्य झाले होते. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट, इन्स्टा आणि आता वेबसाईट बंद झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिला आहे. यावर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके काही प्रतिक्रिया देणार किंवा पाऊल उचलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Cockroach Janata Party Latest news)
कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अभिजीत दिपके यांनी आपल्या समर्थकांना ही चूक टाळण्याचा सल्ला दिला होता. तसेच तशी कोणतीही निदर्शने झाल्यास त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. ज्यामुळे आपल्या चळवळीवर परिणाम होईल. सरकारला आपण एक चूक करावी, हेच हवं आहे. त्यामुळे आपण तसं करु नये. ही मोठी लढाई आहे आणि आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले होते.
अभिजीत दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पक्षाबाबत लोकांमध्ये फार जास्त उत्सुकता आहे त्याचे वेगळे प्रतिसाद घराजवळ उमटू नये म्हणून पोलीस संरक्षण घेऊन दक्षता घेतली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज अंतुलकर यांनी दिली. पुढील काही दिवस त्यांच्या घराला सुरक्षा कायम राहील, असे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.