IPL 2026 – अय्यरचा रौद्र अवतार! शतकाच्या जोरावर पंजाबचा धडाकेबाज विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत
पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत 7 विकेट्सने विजय मिळवला. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, मात्र कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणले. प्रभसिमरनने 69 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर अय्यरने (101*) कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत शानदार शतक झळकावले.
याआधी लखनऊने जोश इंग्लिसच्या 72 धावा आणि आयुष बडोनीच्या 43 धावांच्या जोरावर 196 धावांचा मजबूत डाव उभारला होता. मात्र पंजाबच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत संयम राखत 18 षटकांत लक्ष्य गाठले. या विजयामुळे पंजाब किंग्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहिल्या असून आता त्यांचे पुढील समीकरण इतर संघांच्या निकालावर अवलंबून आहे.
Comments are closed.