भारताचा प्रजनन दर कमी होत आहे
6 राज्यं वगळता सर्व राज्यांमध्ये घसरला आलेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा एकूण प्रजनन दर (टोटल फर्टिलिटी रेट) 2.1 वरून घटत 1.9 वर आला आहे. यासंबंधी माहिती 2024च्या नव्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (एसआरएस) अहवालातून प्राप्त झाली आहे. बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड यासारखी राज्यं वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये टीएफआर ‘रिप्लेसमेंट लेव्हल’ (बदलाचा स्तर) पेक्षा कमी आला आहे. दिल्लीत (1.2) टीएफआर सर्वात कमी आहे, त्यानंतर केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा क्रमांक येतो. तेथे टीएफआर 1.3 इतका आहे.
टीएफआर 2.1 होतो, तेव्हा त्याला ‘रिप्लेसमेंट लेव्हल’ म्हटले जाते. प्रजनन दर दीर्घकाळापर्यंत या स्तरापेक्षा खाली राहतो, तेव्हा लोकसंख्या वृद्धी मंदावते आणि अखेरीस नकारात्मकही होऊ शकते.
अहवालापूर्वीच्या एका दशकात झालेल्या टक्केवारी बदलावर नजर टाकल्यास बिहारमध्ये टीएफआरमध्ये सर्वात कमी घट झाली आहे. 2012-14 च्या 3.2 टीएफआरपासून 2022-24 मध्ये 2.9 वर टीएफआर आला आहे. ही घट केवळ 9.4 टक्के इतकी आहे. प्रजनन दरात घसरण होत असूनही कामकाजाच्या वयोगटातील लोकसंख्या मात्र वाढत आहे.
छत्तीसगड, आसाममध्ये अधिक
छत्तीसगड आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये टीएफआर अधिक आहे आणि तेथे अनुक्रमे 11.5 टक्के आणि 13 टक्क्यांची अपेक्षेपेक्षा कमी घसरण दिसून आली आहे. तर दिल्ली आणि तामिळनाडूत टीएफआर पूर्वीच अत्यंत कमी (1.7) होता आणि तेथे अनुक्रमे 29.4 टक्के आणि 23.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सर्वाधिक टीएफआर असणारी राज्यं
राज्य ग्रामीण शहरी एकूण
बिहार ३.० २.३ २.९
उत्तर प्रदेश २.७ २.१ २.६
राजस्थान २.६ १.८ २.४
छत्तीसगड 2.4 1.6 2.2
झारखंड २.३ १.७ २.२
सर्वात कमी टीएफआर असणारी राज्यं
तामिळनाडू 1.3 1.3 1.3
पश्चिम बंगाल १.४ १.१ १.३
दिल्ली १.३ १.२ १.२
Comments are closed.