Share Market News – सेन्सेक्सची 1000 अंकांची उसळी, निफ्टी 24 हजारांच्या पार; गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई
अमेरिका इराण युद्धामुळे दबावात असलेल्या शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त तेजी दिसून आली. दोन्ही देशांमध्ये शांतता करार होण्याची शक्यता आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला आणि बाजारात तेजी परत आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 1000 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 24000 या महत्त्वाच्या टप्प्याच्या वर बंद झाला. त्यामुळे आता बाजारात तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई झाली आहे. सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,488.96 वरं बंद झाला. तर निफ्टीतही 312 अंकांची वाढ होत तो 24,031.70 वर बंद झाला. तसेच बँक निफ्टीमध्ये 1,238.30 वाढ होत तो 55,293.65 वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. बीएसई 150 मिडकॅप आमि बीएसई 250 स्मॉलकॅपमध्ये देखील तेजी दिसून आली.
निफ्टी बँक, वित्तीय सेवा, खासगी बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 3 टक्क्यांनी वधारला. निफ्टी ऑटो, रिअल्टी, ऑईल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. तर निफ्टी एफएमसीजीच्या मध्ये घसरण झाली.
शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळं गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटींची कमाई केली आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 463 लाख कोटी रुपयांवरुन वाढून 469 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात करार होण्याची शक्यता, क्रूड ऑईलच्या दरात झालेली घसरण, क्रूड ऑईलच्या एका बॅरलचा दर 98 डॉलर्सपर्यंत घसरला.याशिवाय रुपया मजबूत होणे, अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्ड मध्ये घसरण झाल्यानं बाजारात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
Comments are closed.