जालन्यात पंपचालकाची माणुसकी, डिझेलसाठी थांबलेल्या शेतकऱ्यांना दिले जेवण
जालन्यात पंपचालकाने माणुसकी जपत डिझेलसाठी थांबलेल्या शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जालन्यातील जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील कल्पतरू या पंपचालकाने पंपावर बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावरच जेवणाच्या पंगती बसवल्या.
जालना जिल्ह्यात एकीकडे पंप चालक आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाचीच्या घटना समोर येत आहे त्यातच या पंप चालकाने दाखवलेल्या माणुसकीच सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान जालन्यात इंधन टंचाई जाणवत असून शेती मशागतीच्या कामाला डिझेल मिळत नसल्याने शेतकरी तासंनतास पंपावर रांगेत उभा आहे.
Comments are closed.