सूर्यकुमार यादवच्या ‘T60 Life’ ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण, पुढील वाटचालीबाबत चाहत्यांचे तर्कवितर्क

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या 2026 च्या टी20 टीमचा यशस्वी कर्णधार व आपल्या तडाखेबंद खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ‘मि. 360’ क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव त्याच्या फॅन्सना कोड्यात टाकणाऱ्या आजच्या त्याच्या एका वैशिष्ट्यपूर्ण X पोस्टमुळे (पूर्वीचे ट्विटर) प्रचंड चर्चेत आला आहे. यावर्षीचा टी20 विश्वचषक हिंदुस्थानला जिंकून देणाऱ्या या कॅप्टनने आज आयपीएल चालू असतानाच अचानक एक X पोस्ट करून आपल्या चाहत्यांना कोड्यात टाकले आहे.

आपल्या X पोस्टमध्ये सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की,”मित्रांनो, मी आता आणखी मोठ्या प्रवासाला सुरुवात करीत आहे. आयुष्याच्या एका नव्या अध्यायात पाऊल ठेवत आहे. एका वेगळ्या वेगात. यालाच म्हणतात #T60Life”.

हे “टी 60 लाईफ आहे” अशा आशयाची केलेली पोस्ट सूर्यकुमार यादवची ही पोस्ट आज संपूर्ण सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे व ती प्रचंड व्हायरल होत आहे. ही X पोस्ट हा आयकॉनिक क्रिकेटपटू कोणत्या वाटेवर जात आहे, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारी ठरले आहे.

या पोस्टवर सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून “सूर्यकुमार कोठे निघाला आहे” किंवा “तो कोणता निर्णय घेणार आहे” तसेच “त्याच्या मनात काय आहे”, अशा नानाविध प्रश्नांचा भडिमार त्याचे चाहते त्याच्या ट्वीटच्या प्रतिसादातून करत आहेत.

सूर्यकुमार यादवची ही पोस्ट आजच्या दिवशी चाहत्यांच्या चर्चेला व उत्सुकतेला उधाण आणणारे ठरले असून सूर्यकुमारने X वर पोस्ट केल्यानंतर अल्पावधीतच हजारो चाहत्यांचे कुतुहल शिगेला पोहोचल्याचे दिसले. “टी 60 लाईफ” यातून सूर्यकुमार यादव आता नेमका कोणत्या वाटेवर आहे व तो पुढे काय संदेश देतो याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed.