Unhealthy Breakfast : नाश्त्यामध्ये खावू नयेत हे पदार्थ
नाश्ता म्हणजे दिवसाच्या सुरुवातीचे पहीले अन्न. यामुळे दिवसभर उर्जावान राहण्यासाठी आपण नाश्ता खातो. पण आपण नाश्त्यामध्ये खात असलेले सगळेच पदार्थ आपल्याला ऊर्जा , प्रोटीन देतात असे नाही. तर काही पदार्थ तुमची शुगर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. म्हणूनच नाश्त्यात कोणते पदार्थ खावू नयेत ते बघूया.
हे पदार्थ खावू नयेत
पोहे,उपमा- जर तुम्ही नाश्त्यामध्ये रव्याचा उपमा किंवा पोहे खात असाल तर ही सवय तात्काळ बदला. कारण या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण सर्वाधिक असते.त्यामुळे या नाश्त्यात जर तुम्ही पोहे, उपमा घेत असाल तर सावध व्हा.
ब्रेड-जॅम
जर तुम्ही नाश्त्यात व्हाईट ब्रेड आणि जाम खात असाल तर तुम्ही करत असलेला नाश्ता हेल्दी नाही हे समजून घ्या. कारण यात प्रोटीन किंवा फायबर नसते. तर फक्त साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा नाश्ता तुमची शुगर वाढवतो.
कॉर्नफ्लेक्स आणि दूध
कॉर्नफ्लेक्स आणि दूध एकत्र केल्यानंतर त्याचा ग्लायमेक्स इंडेक्स अधिक होतो. यामुळे जर तुम्ही दररोज हा नाश्ता करत असाल तर तुमचे वजन वाढते.एवढेच नाही तर शुगरही वेगाने वाढते.
चहा-बिस्कीट-खारी
बिस्कीट किंवा खारी मैदा, साखर, पाम तेलापासून बनते. यामुळे शुगर तर वाढतेच शिवाय वजनही वाढते.
बटाटा पराठा
आपल्याकडे काहींना आलू के पराठे म्हणजे बटाट्याचे पराठे नाश्तामध्ये खाण्यास आवडतात. पण बटाट्यामुळे शुगर वाढते, कोलेस्ट्ऱॉलही वाढते.
Comments are closed.