‘इबोला’ विषाणूवर लस विकसित केल्याचा रशियाचा दावा; जगाला मोठा दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘कोरोना’इतकाच घातक मानला जाणाऱ्या नवीन ‘इबोला’ विषाणूने सर्वच देशांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूप्रमाणे हा नवीन विषाणू जगभर फैलावणार की काय, अशी चिंता सतावत आहे. याचदरम्यान रशियातील शास्त्रज्ञांनी ‘इबोला’ विषाणूचा प्रतिकार करणारी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेतील रशियन दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली आहे. नव्या विषाणूवरील लसीच्या शोधामुळे जगाला मोठा दिलासा मिळणार आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन शास्त्रज्ञांनी ‘इबोला’च्या नवीन प्रकाराचा सामना करणारी लस विकसित केली आहे. ही लस डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगोमध्ये उद्भवलेल्या साथीशी संबंधित आहे. ‘इबोला’च्या दुर्मिळ ‘बुंदिबुग्यो’ (Bundibugyo) प्रकारापासून संरक्षण देण्याची क्षमता लसीमध्ये आहे, असा दावा रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी केला आहे. दूतावासाच्या पोस्टमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाच्या साथीचा वाढता धोका असून या विषाणूच्या विविध प्रकारांपासून व्यापक लसीकरणाद्वारे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान रशियन शास्त्रज्ञांनी नवीन लस विकसित केल्याचा दावा आफ्रिकेतील रशियन दूतावासाने केला आहे.

Comments are closed.