29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर आयपीएल 2026 : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 47 धावांनी दारूण पराभव केला आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगाशी आला. राजस्थानचा युवा वैभव सुर्यवंशी याने हैदराबादच्या गोलंदाजांना असं काही धो-धो धुतलं की, अख्खी ऑरेंज आर्मी मैदानावर फक्त पाहत राहिली. वैभवने हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः धुळदाण उडवत अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांचा पाऊस पाडला. या लाजिरवाण्या पराभवासह सनरायझर्स हैदराबादचे आयपीएल 2026 मधील आव्हान संपुष्टात आले आहे, तर राजस्थानने थेट क्वालिफायर-2 मध्ये धडक मारली आहे.
भेटूया २९ तारखेला 🔥👊 pic.twitter.com/jPuEq0P1qC
— राजस्थान रॉयल्स (@rajasthanroyals) 27 मे 2026
29मे ला क्वालिफायर 2 मध्ये गुजरातशी सामना!
हैदराबादला घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता राजस्थान रॉयल्स थेट क्वालिफायर 2 मध्ये पोहोचली आहे. 29 मे रोजी त्यांचा सामना आयपीएलमधील दुसरा बलाढ्य संघ गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) होणार आहे. या महामुकाबल्यात जो जिंकेल, तो थेट आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पोहोचेल, जिथे महाविजेता होण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) आधीच गेली आहे.
क्वालिफायर 2 अधिकृतपणे लॉक केलेले आहे! 🔒
शिखर चढाईसाठी एक अंतिम अडथळा 🎟️#TATAIPL | #क्वालिफायर2 | #The FinalLeap | #GTvRR pic.twitter.com/y73BAkfWXC
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 27 मे 2026
12 षटकार, 5 चौकार अन् 29 चेंडूत 97 धावा! (Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator)
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण राजस्थानच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला. वैभवने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, अवघ्या 29 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 97 धावांची स्फोटक खेळी केली. त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले. वैभवने पहिल्या विकेटसाठी यशस्वी जैस्वाल (29) सोबत अवघ्या 48 चेंडूत 125 धावांची वादळी भागीदारी करून संघाला ऐतिहासिक सुरुवात करून दिली.
यानंतर मधल्या फळीत विकेटकीपर ध्रुव जुरेलने 21 चेंडूत 50 धावा ठोकून राजस्थानचा डाव वेगाने पुढे नेला. कर्णधार रियान परागने 12 चेंडूत 26 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये हैदराबादने काही प्रमाणात पुनरागमन केले, मात्र राजस्थानने 240 चा टप्पा ओलांडलाच. हैदराबादकडून फिरकीपटू प्रफुल हिंगे याने महागडा ठरला असला सर्वाधिक 3 बळी घेतले. शिवांग कुमार आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला, तर मुख्य गोलंदाज पॅट कमिन्स आणि ईशान मलिंगा यांना एकही विकेट मिळाली नाही.
हैदराबादची धक्कादायक सुरुवात! अभिषेक शर्मा शून्यावर OUT
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. जोफ्रा आर्चरने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेकला आपले खाते उघडता आले नाही. त्यानंतर आर्चरने इशान किशनला बाद करून हैदराबादला आणखी एक मोठा धक्का दिला. इशानने 11 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या होत्या. बघता बघता 81 धावांवर सनरायझर्स हैदराबादचा निम्मा संघ तंबूत परतला होता. स्मरण रविचंद्रन (1) ट्रॅव्हिस हेड (17) पॅट कमिन्स (1) धावेवर बाद झाले. त्यानंतर रवींद्र जडेजाने साहिल अरोराला बाद करून हैदराबादची शेवटची आशा संपवली. हैदराबादचा संघ 196 धावांवर सर्वबाद झाला.
— सनरायझर्स हैदराबाद (@SunRisers) 27 मे 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.