'धुरंधर' फेम चा चहाचा टप्पा
आत बसायचे असल्यास मानावी लागणार एक अट
सौम्या चटर्जी नावाच्या एका बंगाली कंटेंट क्रिएटरला लडाखच्या रस्त्याहंवर फिरताना एक असे सिनेमाई सरप्राइज मिळाले, ज्याने तिच्या साधारण टी ब्रेकला मिनी मूव्ही ट्रिपमध्ये बदलून टाकले. तेथे प्रसिद्ध ‘धुरंधर टी स्टॉल’ तिला आढळून आला, ज्याला लोक धुरंधर चित्रपटात पाहून ओळखू लागले आहेत.
सौम्याने या खास ठिकाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने त्या टी स्टॉलची झलक दाखविली असून जो चित्रपटात दिसून आल्यावर अत्यंत चर्चेत आला आहे. व्हिडिओत ती वाश्मा बट्ट नावाच्या टी स्टॉलमध्ये जाताना दिसून येते, जो लडाखच्या मार्केटच्या गल्ल्यांमध्ये आहे.
या दुकानात बसून वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एक मजेशीर नियम आहे. येथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कमीतकमी दाने कप चहाची ऑर्डर द्यावी लागते, भले मग तो कुणासोबत आला असो किंवा एकटा असे सौम्या व्हिडिओत सांगताना दिसून येते. यानंतर व्हिडिओत दुकानातील अंतर्गत दृश्य दाखविण्यात आले आहे. जेथे भिंतीवर चित्रपटाशी निगडित पोस्टर, सीन आणि रेफरेंस लावलेले दिसून येतात. पूर्ण चहा स्टॉल फॅनझोनप्रमाणे वाटतो. सौम्याने दुकानात ठेवण्यात आलेले फिल्म-थीमयुक्त मर्चेंडाइज आणि स्मरणीय गोष्टींची झलकही दाखविली आहे. ज्यातून या ठिकाणाला खास करण्यासाठी बरीच मेहनत घेण्यात आली होती हे स्पष्ट होते.
Comments are closed.