Pooja Bhatt on Bobby Deol “त्याच्यासोबतचा काळ खूप”… बॉबी देओलसोबतच्या प्रेमप्रकरणावर पूजा भट्ट स्पष्टच बोलली

अभिनेत्री पूजा भट्ट आणि अभिनेता बॉबी देओल यांच्यातील नात्याची काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये प्रचंड चर्चा होती. दोघांच्या नात्याच्या खुलेपणाने चर्चा होण्याचा तो काळ होता.

विशेष म्हणजे अभिनेता बॉबी देओल आणि तान्या देओल यांचा विवाह ३० मे १९९६ रोजी झाला होता. सध्या ते दोघे सुखाने नांदत आहेत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा बॉबी देओल आणि पूजा भट्ट यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. अलीकडेच पूजा भट्ट या आपल्या जुन्या प्रेमप्रकरणावर बोलताना खुलेपणाने व्यक्त झाली आहे.

आयुष्यातला सुंदर काळ

विकी लालवाणीसोबतच्या संभाषणात पूजाने अनेक खुलासे केले.  तू आणि बॉबी प्रेमात होते का? या प्र्श्नावर थेटपणे उत्तर देताना पूजा, म्हणाली, “नक्कीच. बॉबीमध्ये न आवडण्यासारखं काय आहे?” बॉबीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना पूजा म्हणाली, “तो माझ्या आयुष्यातील एक खूप खास आणि सुंदर काळ होता आणि त्याच्यासोबत असणे हा एक अद्भुत अनुभव होता.”

Comments are closed.