मालाड येथे आज शिवसेनेचा बीएलए मेळावा
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्व ठिकाणी जनगणना (एसआयआर) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयोगाने नेमलेल्या बीएलओ यांना सहकार्य करण्यासाठी आणि प्रत्येक यादीच्या भागात आपल्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी यादीनिहाय बीएलए नेमा, असे आदेश शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर विभाग क्र. 2 (मालाड, चारकोप, कांदिवली) विधानसभा क्षेत्रातील बीएलए शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, कार्यालयप्रमुख पदाधिकारी मेळावा उद्या, रविवारी सकाळी 11 वाजता कोळी समाज सभागृह, मालाड पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई प्रमुख मार्गदर्शन करणार आहे. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, विभाग समन्वयक अशोक पटेल, विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख कैलास कणसे, राजू खान, संतोष धनावडे, नगरसेविका गीता भंडारी उपस्थित राहतील.
Comments are closed.