सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल मध्यरात्री उपोषण मागे घेतलं आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी काल सकाळी 10 वाजतापासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यानंतर काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी रात्री साडेदहा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1.15 वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं.

सरकारने राधाकृष्ण विखे पाटलांनी ड्राफ्ट आणला तर आम्ही अभ्यासक बोलावले. अभ्यासकांनी मागणीनुसार सहमती दिली. कुणबी नोंदीचा दस्तावेज देण्याचे मान्य केले आहे. व्हॉलिडिटी बाबत 15 दिवसाला आढावा घेतला जाणार आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. तसेच राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारूनच हे आपण करत असल्याचे शिष्टमंडळ सांगत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी विचारुनच ही सगळी कार्यवाही करायला लावली आणि देवेंद्र फडणवीसांनी याला होकार दिला, अशी माहिती शिष्टमंडळाने दिल्याचं मनोज जरांगे म्हणाले. (Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला- राधाकृष्ण विखे पाटील (Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest)

अनेक विषय राज्य सरकारकडून मान्य झाले. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आहेत. त्याच्यावर आता लगेच आम्ही पुढच्या दोन-तीन दिवस शासन निर्णय काढून सुरुवात करणरा आहोत.

मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? (Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest)

  1. 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार
  2. नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार
  3. जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांत बैठक घेणार
  4. सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ
  5. न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ
  6. प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन
  7. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन
  8. मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचं उपोषण मागे, सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री 1.15 वाजता काय घडलं?

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचं आमरण उपोषण मागे; सरकारकडून कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.