डीआरडीओने शक्तिशाली बॉम्बची चाचणी केली

2 किलोमीटरपर्यंत जाणवला स्फोटाचा प्रभाव

वृत्तसंस्था/ पंचकूला

भारताने आणखी एक नवे यश मिळविले आहे. डीआरडीओने हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यातील रामगढ येथे टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लेबोरेटरीत एक उच्च क्षमतायुक्त बॉम्बचे यशस्वी परीक्षण केले आहे. ही डीआरडीओचीच एक युनिट आहे. परीक्षणाची संवेदनशीलता पाहता पूर्ण क्षेत्रात हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता.

डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा ‘टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लेबोरेटरीने (टीबीआरएल) रविवारी हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यातील रामगढ परीक्षण रेंजमध्ये या बॉम्बचे परीक्षण केले आहे. परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंचकूला जिल्ह्dयातील भानू आणि बिल्ला गावांच्या रहिवाशांना निर्धारित कालावधीत घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता.

विस्फोटादरम्यान बॉम्बचे तुकडे जवळपास 1.5 किलोमीटरच्या उंचीपर्यंत पोहोचण्याचा अनुमान होता आणि विस्फोट स्थळापासून 2 किलोमीटरच्या कक्षेत हे तुकडे फैलावण्याची शक्यता होती. याचमुळे परीक्षण सुरक्षितपणे संचालित करण्यासाठी विस्फोट स्थळाच्या चहुबाजूला दोन किलोमीटरचे सुरक्षा क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.

परीक्षण रेंजच्या नजीक भानू आणि बिल्ला गावात बॉम्बचे तुकडे पडण्याची भीती होती, याचमुळे पंचकूला जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना परीक्षणाच्या कालावधीदरम्यान घरातच थांबण्याचा सल्ला पूर्वीच दिला होता.

 

Comments are closed.