‘शिव संचार सेने’तर्फे सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिर; 7 जूनला शिवसेना भवन येथे आयोजन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संलग्न ‘शिव संचार सेने’तर्फे 7 जून रोजी शिवसेना भवन येथे विशेष सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात फिशिंग, हॅकिंग, ऑनलाइन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, ओटीपी स्कॅम आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. डिजिटल सुरक्षितता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय याबाबतही माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमास शिवसेना नेते व विधिमंडळ पक्षनेते आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. शिबिर सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी शिवसेना भवन येथे किंवा WhatsApp क्रमांक +९१ ९६१९३ ३८७३४ वर संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.