IPL 2026 – आयपीएलमधून वैभव सूर्यवंशीची कोटीच्या कोटी उड्डाणे, पहा किती केली कमाई
आयपीएल 2026 चा हंगाम राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी जबरदस्त कमाईचा ठरला आहे. या हंगामात तब्बल 776 धावा करून वैभवने मानाची ‘ऑरेंज कॅप’ तर पटकावलीच, पण त्याचसोबत कोट्यवधी रुपयांची कमाईही केली.
गेल्या मेगा लिलावात राजस्थानने त्याला अवघ्या 1.10 कोटी रुपयांना रिटेन केले होते. मात्र, या हंगामातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने मानधनाव्यतिरिक्त मॅच फी आणि विविध पुरस्कारांमधून २.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.
जरी राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, तरी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानंतर वैभवला खास आमंत्रित करण्यात आले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात वैभव सूर्यवंशीला या हंगामातील ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ म्हणून गौरवण्यात आले.
पुरस्कार आणि बक्षीस रक्कम
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP): 15 लाख रुपये
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा): 10 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन: 10 लाख रुपये (सोबत एक ‘टाटा सिएरा’ कार)
सुपर सिक्सेस ऑफ द सीजन (72 षटकार): 10 लाख रुपये
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन (उदयोन्मुख खेळाडू): 10 लाख रुपये
मॅच फीमधून मोठी कमाई
1.10 कोटी रुपयांच्या वार्षिक मानधना व्यतिरिक्त (Retainer Fee), आयपीएलच्या नियमांनुसार वैभवला प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये ‘मॅच फी’ मिळाली. या हंगामात तो राजस्थानसाठी सर्व 16 सामने खेळला. त्यामुळे केवळ मॅच फीच्या माध्यमातून त्याने १.२० कोटी रुपये कमावले.
याशिवाय, विविध सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ किंवा ‘इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच’ आणि ‘मोस्ट सिक्सेस ऑफ द मॅच’ असे अनेक पुरस्कार मिळाले.
वैभवची एकूण कमाई
वार्षिक मानधन (१.१० कोटी), मॅच फी (१.२० कोटी) आणि विविध वैयक्तिक पुरस्कारांची रक्कम (५५ लाख) मिळून या १५ वर्षांच्या तरुण खेळाडूने आयपीएल २०२६ मधून २.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Comments are closed.