सुनील गावस्कर यांनी केली रिषभ पंतची पाठराखण; म्हणाले…
आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. लखनौने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूला आपला कर्णधार बनवलं. पण तो देखील संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकलेला नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना लखनौ सुपर जायंट्सला १४ पैकी केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. या फ्लॉप कामगिरीनंतर, आयपीएल संपायच्या आधीच ऋषभ पंतने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतने स्वतः कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पोस्ट शेअर करून दिली होती.
भारताचे माजी कर्णधार ऋषभ पंत यांनी ऋषभ पंतच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आधी केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. केएल राहुलने संघाची साथ सोडल्यानंतर ही जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली. पंतला २७ कोटींची बोली लावून संघात स्थान दिलं. त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण गेल्या २ हंगामात लखनौचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी राहिला.
आयपीएल संपायच्या आधीच ऋषभ पंतने कर्णधारपद सोडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ऋषभ पंत आणि लखनौचे प्रशिक्षक यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या. लखनौचा संघ हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक प्रशिक्षक असलेला संघ होता. संघात जास्त प्रशिक्षक असल्यामुळे त्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो, ही बाब पंतने लक्षात आणून दिली होती. लखनौच्या ताफ्यात एकापेक्षा एक अनुभवी प्रशिक्षक होते. ज्यात टॉम मूडी, जस्टिन लेंगर, भरत अरुण आणि केन विलियमसनसारख्या दिग्गजांचा समावेश होता.
सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारच्या कॉलममध्ये लिहिले की, “ऋषभ पंतने कर्णधारपदावरून माघार घेणं हा पुढील हंगामात नवीन कर्णधार दिसणार याचे संकेत आहेत. यासह आणखी काही बदल पाहायला मिळू शकतात. त्याने अनेकदा सांगितलं होतं, की निर्णय घेताना पंतच्या कानावर अनेक आवाज पडत होते. त्याच्याभोवती विचारसरणीचे अनेक वेगवेगळे प्रवाह सक्रिय होते. हे निश्चितच सपोर्ट स्टाफसाठी कौतुकास्पद नाही.” सपोर्ट स्टाफच्या या अतिहस्तक्षेपणामुळे आणि गोंधळामुळेच पंतला पदावरून पायउतार व्हावे लागले का? पंतच्या निर्णयानंतर संघात आणखी मोठे बदल होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Comments are closed.