आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल; भारत-पाकिस्तान सामन्याबाबतही मोठी अपडेट समोर
31 मे रोजी अहमदाबाद येथे जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत महिला क्रिकेटबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 आधी ठरल्याप्रमाणे जून-जुलैमध्ये न होता, आता 14 ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान खेळवली जाईल.
पुरुषांची चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे (50 ओव्हर्स) फॉरमॅटमध्ये खेळली जाते, पण महिलांची ही चॅम्पियन्स ट्रॉफी टी20 फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील. 2028 सालच्या महिला टी20 वर्ल्ड कपचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील (IND and PAK) तणावामुळे भारतीय महिला संघ पाकिस्तानला जाणार नाही. भारताचे सर्व सामने ‘न्यूट्रल वेन्यू’वर (तटस्थ ठिकाणी) आयोजित केले जातील, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी आयसीसी ‘वुमेन्स इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी’ नावाची नवीन टी20 स्पर्धा सुरू करणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील, ज्यामध्ये 5 आयसीसीचे पूर्ण सदस्य देश आणि 5 सहयोगी (असोसिएट) सदस्य देश असतील. मात्र, या स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Comments are closed.