तुमची स्मार्ट कार तुम्हाला पाहत आहे का? डेटा गोपनीयतेची वाढती समस्या

आजची आधुनिक वाहने ही केवळ प्रवासाची साधने नसून ती इंटरनेटशी जोडलेली स्मार्ट उपकरणे बनली आहेत. जीपीएस, ब्लूटूथ, व्हॉईस कमांड्स, कनेक्टेड ॲप्स आणि सेन्सर्सने ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर केले आहे. पण या सुविधांसोबतच एक महत्त्वाचा प्रश्न येतो – तुमची कार तुम्हाला पाहत आहे का?
आज अनेक वाहने असंख्य सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर प्रणालींनी सुसज्ज आहेत. या प्रणाली वाहनाचा वेग, स्थान, ब्रेकिंग पॅटर्न, इंधन वापर, वाहन चालवण्याच्या सवयी आणि काहीवेळा मोबाइल फोनशी जोडलेली वैयक्तिक माहिती देखील गोळा करतात. ही माहिती वाहन उत्पादक कंपन्या, सेवा केंद्र किंवा तृतीय पक्ष कंपन्यांपर्यंत पोहोचू शकते.
तुमचे कार हॅक केले जाऊ शकते? सायबर सुरक्षेचा वाढता धोका! – नवराष्ट्र
उदाहरणार्थ, कारमध्ये नेव्हिगेशन प्रणाली ड्रायव्हर्सचे नियमित मार्ग रेकॉर्ड करू शकतात. काही कनेक्ट केलेल्या कारमध्ये व्हॉईस असिस्टंट असल्याने, व्हॉइस कमांडशी संबंधित माहिती देखील संग्रहित केली जाते. अपघात झाल्यास वाहनातील डेटा अपघाताचे कारण शोधण्यासाठी उपयुक्त ठरतो, मात्र हाच डेटा अन्य व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डेटा संकलनाचेही काही फायदे आहेत. हा डेटा वाहनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, वेळेवर देखभाल सूचना प्रदान करण्यासाठी, चोरी झालेल्या वाहनांचा मागोवा घेण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. पण यासोबत प्रायव्हसीचा मुद्दा येतो.
तुमचे डेटा ते सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील ॲप्स किती सुरक्षित आहेत?
वाहनधारकांनी कार खरेदी करताना कंपनीचे डेटा गोपनीयता धोरण वाचले पाहिजे. मोबाईल ॲप्सना दिलेल्या परवानग्या तपासणे, अनावश्यक डेटा शेअरिंग थांबवणे आणि सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
भविष्यात कनेक्ट केलेले आणि स्वयंचलित वाहनांची संख्या वाढेल. त्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी डेटा सुरक्षा आणि गोपनीयता हे मोठे आव्हान असणार आहे. स्मार्ट कार सुविधा देत असल्या तरी वापरकर्त्यांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
Comments are closed.