झ्वेरेव, ओदार उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गतविजेता कार्लोस अल्काराजच्या माघारीनंतर दुसऱयाच फेरीत बाद झालेला उपविजेता यानिक सिनर आणि पाठोपाठ ऑलटाइम ग्रेट नोव्हाक जोकोविचच्या पराभवामुळे यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी ग्लॅमरच कमी झाले असले तरी यंदा स्पर्धेला नवा विजेता लाभणार आहे.

स्पॅनिश राफायल ओदारने आपल्याच देशाच्या पाबलो करेनो बुस्ताचा पाच सेटच्या कडव्या झुंजीत 4-6, 4-6, 6-2, 6-2, 6-2 असा पराभव करत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. झ्वेरेवने चौथ्या फेरीत जेस्पर डी याँगचा त्याने 7-6 (7-3), 6-4, 6-1 असा सहज पराभव करत जेतेपदाच्या दिशेने पावले टाकली. तसेच मेनसिकने आंद्रे रुबलेव्हचा 6-3, 7-6 (8-6), 4-6, 2-6, 6-3 असा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली.

Comments are closed.