आईच्या बॉयफ्रेंडकडून अमानुष छळ, डोकं भिंतीवर आपटून संपवलं; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगाव
केरळ गुन्हे: देशभरात लहान मुलांवर अत्याचार होण्याच्या घटना दररोज कानावर पडत असताना केरळमधील तिरुवनंतपुरम येथे अंगावर शहारे आणणारी एक घटना घडली आहे. तिरुवनंतपुरम येथे एका दीड वर्षांच्या लहान मुलाची छळ करुन हत्या (Murder news) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या लहान मुलाचे नाव अर्शिद असे होते. तो त्याची आई अकिला आणि तिचा बॉयफ्रेंड अशगर यांच्यासोबत राहत होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून अशगर चिमुकल्या अर्शिदचा छळ करत होता. 28 मे रोजी अकिला कामावर गेली होती. त्यावेळी अशगर आणि चिमुकला अर्शिद हे दोघेच घरी होते. त्यावेळी जेवत असताना अर्शिद खोकला म्हणून राग आलेल्या अशगरने त्याचे डोके भिंतीवर जोरात आपटले. हाच घाव वर्मी बसल्यामुळे चिमुकल्या अर्शिदचा मृत्यू झाला. (Keralam crime news)
अर्शिद हा त्याच्या आईच्या पोटात असतानाच त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर अर्शिदची आई अकिला तिचा बॉयफ्रेंड अशगर याच्यासोबत राहू लागली होती. मात्र, अशगरचा चिमुरड्या अशगरवर प्रचंड राग होता. तो घरात सतत अर्शिदचा छळ करायचा. अशगरने सुरुवातीला अर्शिदला रुग्णालयात आणले तेव्हा जेवताना खोकल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 15 दिवसांपूर्वीच चिमुकला अर्शिद आणि त्याच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका इन्फ्लुएन्सरने शुट केलेल्या या व्हिडीओत दीड वर्षांच्या अर्शिदचे दोन्ही हात तुटल्यामुळे त्याला प्लॅस्टर केल्याचे दिसत आहे. यावेळी अकिलाला कारण विचारले असता तो सायकलवरुन पडल्याचे तिने हसतहसत सांगितले होते. परंतु, नंतर त्याच्या दोन्ही हातांवर जड वस्तूचा दाब पडल्यामुळे हाडं तुटल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या तपासात अशगर यानेच अर्शिदच्या दोन्ही हातांवर पायाने जोरात पाय दिल्याने त्याची हाडं तुटल्याचे स्पष्ट झाले. अशगरने 28 मे रोजी रुग्णालयात आणल्यानंतर अर्शिद हा मृतावस्थेत होता. त्यावेळी अर्शिदच्या आजी-आजोबांना संशय आला. त्यामुळे त्यांनी अर्शिदच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. हे शवविच्छेदन झाल्यानंतर अहवालात हादरवून टाकणारी माहिती समोर आली होती.
या पोस्टमार्टेम अहवालानुसार, दीड वर्षांच्या अर्शिदच्या शरीरावर थोड्याथोडक्या नव्हे तर 51 जखमा आढळून आल्या. त्याच्या अंगावर सिगारटेच्या चटक्यांच्या अनेक खुणाही होत्या. यावरुन अशगर त्याला सिगरेटचे चटके देऊन त्याचा छळ करायचा, हे स्पष्ट झाले आहे. अशगर हा चिमुरच्या अर्शिदला अनेकदा मारहाण करायचा. यावर अकिला काहीच बोलायची नाही. अशगरने पाय देऊन चिमुरड्या अर्शिदचे हात मोडले होते तेव्हाही अकिराने हसतहसत तो सायकलवरुन पडल्याचे खोटे सांगितले होते. या घटनेचा तपशील समोर आल्यानंतर केरळसह देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
Crime news: अशगरवर शेजाऱ्यांचा हल्ला, पोलिसांनी कसबसं बाहेर काढलं
ही सगळी घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी अशगरला त्याच्या घराजवळ नेले होते. तोपर्यंत अशगरने चिमुकल्या अर्शिदला कशाप्रकारे हालहाल करुन मारले, याची माहिती बाहेर आली होती. त्यामुळे पोलिसांनी अशगरला घटनास्थळी नेल्यानंतर तेथील स्थानिकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. मात्र, पोलिसांनी त्याला कसेबसे संरक्षण देऊन पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासात अशगर याने आपल्या पहिल्या पत्नीचाही हुंड्यासाठी छळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशगरची पहिली पत्नी जवळपास एक वर्ष कोमात होती. त्यानंतर आता अशगरने चिमुकल्या अर्शिदला हालहाल करुन मारल्याने आता त्याच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.