IND Vs NZ – क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी! कसोटी, वनडे आणि टी20; न्यूझीलंडविरुद्ध भरगच्च वेळापत्रक BCCI ने केली जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 चा थरार संपताच BCCI ने हिंदुस्थानच्या न्यूझीलंड दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. क्रिकेट प्रेमींसाठी हा दौरा एक मोठी पर्वणी ठरणार असून, आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल. या दौऱ्यात टीम इंडिया एकूण 12 सामने खेळणार असून, यामध्ये 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. मालिकेची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून टी20 सामन्यांनी होणार असून, हा दौरा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे.

न्यूझीलंडमधील वेळेच्या फरकामुळे हिंदुस्थानी चाहत्यांना हे सामने पाहण्यासाठी आपल्या वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. टी20 मालिकेतील सर्व सामने हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील. तर वनडे सामने सकाळी 8:30 वाजता खेळवले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही देशांमधील प्रतिष्ठेची कसोटी मालिका पाहण्यासाठी हिंदुस्थानी चाहत्यांना आपली झोप मोडावी लागणार आहे, कारण कसोटी सामने हिंदुस्थानी वेळेनुसार पहाटे 4:30 वाजता सुरू होणार आहेत.

हा संपूर्ण दौरा न्यूझीलंडमधील प्रमुख आणि नयनरम्य मैदानांवर खेळवला जाईल. टी20 सामने क्राइस्टचर्च, वेलिंगटन, ऑकलंड आणि हैमिल्टन येथे होतील, तर वनडे सामन्यांचे आयोजन ऑकलंड, वेलिंगटन, हैमिल्टन आणि माउंट माउंगानुई येथे केले गेले आहे. दौऱ्याचा शेवट वेलिंगटन आणि क्राइस्टचर्च येथील मैदानांवर दोन कसोटी सामन्यांनी होईल. जर शेवटचा कसोटी सामना पूर्ण 5 दिवस चालला, तर या दौऱ्याचा समारोप 1 डिसेंबर रोजी होईल.

हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिका

  1. 22 ऑक्टोबर – दुपारी 1:30 वाजता (क्राइस्टचर्च, हेगले ओवल)
  2. 24 ऑक्टोबर – दुपारी 1:30 वाजता (क्राइस्टचर्च, हेगले ओवल)
  3. 27 ऑक्टोबर – दुपारी 1:30 वाजता (वेलिंगटन, एचएनआरवाई स्टेडियम)
  4. 30 ऑक्टोबर – दुपारी 1:30 वाजता (ऑकलंड, ईडन पार्क)
  5. 01 नोव्हेंबर – दुपारी 1:30 वाजता (हैमिल्टन, सेडन पार्क)

हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका

  1. 04 नोव्हेंबर – सकाळी 8:30 वाजता (ऑकलंड, ईडन पार्क)
  2. 07 नोव्हेंबर – सकाळी 8:30 वाजता (वेलिंगटन, एचएनआरवाई स्टेडियम)
  3. 10 नोव्हेंबर – सकाळी 8:30 वाजता (हैमिल्टन, सेडन पार्क)
  4. 13 नोव्हेंबर – सकाळी 8:30 वाजता (माउंट माउंगानुई, बे ओवल)
  5. 15 नोव्हेंबर – सकाळी 8:30 वाजता (माउंट माउंगानुई, बे ओवल)

हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

  1. 19 ते 23 नोव्हेंबर – पहाटे 4:30 वाजता (वेलिंगटन, बेसिन रिजर्व)
  2. 27 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर – पहाटे 4:30 वाजता (क्राइस्टचर्च, हेगले ओवल)

Comments are closed.