बापरे! 34,000 कामगारांसह, हा जगातील सर्वात मोठा कार उत्पादन कारखाना आहे!

तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रोज इतक्या गाड्या पाहतो, रोज इतक्या गाड्या विकल्या जातात आणि इतक्या गाड्या तयार होतात, मग या गाड्या बनवण्याचा जगातील सर्वात मोठा कारखाना कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आज येथे पाहूया.
तर दक्षिण कोरियात ह्युंदाई मोटर कंपनीच्या उल्सान कारखान्यात जगातील सर्वात मोठी कार उत्पादन सुविधा आहे. हे औद्योगिक संकुल केवळ कारखाना नसून एक स्वतंत्र 'ऑटोमोबाईल सिटी' आहे.
1968 मध्ये सुरू झालेल्या या कारखान्याचे क्षेत्रफळ सुमारे 50 लाख चौरस मीटर (1,200 एकरपेक्षा जास्त) आहे. यात पाच स्वतंत्र उत्पादन प्रकल्प, इंजिन आणि ट्रान्समिशन उत्पादन युनिट आणि वाहन निर्यातीसाठी स्वतःचे स्वतंत्र बंदर आहे. कारखाना दररोज सुमारे 5,500 ते 6,000 वाहनांचे उत्पादन करतो, तर वार्षिक उत्पादन क्षमता 15 लाख वाहनांची आहे.
ह्युंदाई VENUE ची विशेष आवृत्ती लाँच! वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या
उल्सान कारखान्याचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रचंड कार्यक्षमता. येथे सरासरी दर 10 ते 12 सेकंदाला एक नवीन वाहन तयार करून सोडले जाते. या कारखान्यात सुमारे 34 हजार कर्मचारी काम करतात.
हा कारखाना जेनेसिस ब्रँडच्या कारसह ह्युंदाईच्या लोकप्रिय एसयूव्ही, सेडान आणि लक्झरी वाहने तयार करतो. येथे उत्पादित उत्पादने जवळपास 200 देशांमध्ये निर्यात केली जातात. कारखान्याच्या स्वतःच्या बंदरातून दररोज हजारो वाहने निर्यातीसाठी जहाजांवर भरली जातात.
ह्युंदाई मोटर्स 'ही' स्वस्त गाडी झाली महाग! तथापि, सुरुवातीची किंमत…
भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनेमागणी लक्षात घेऊन ह्युंदाईने कोरियाचे पहिले ईव्ही उत्पादन केंद्र उल्सान येथे सुरू केले आहे. सुमारे 2 ट्रिलियन वॉनच्या गुंतवणुकीसह दरवर्षी 200,000 इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, जे अंदाजे $1.5 अब्ज आहे.
दक्षिण कोरियाच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक मानला जाणारा कारखाना आज जगभरातील ऑटोमोटिव्ह उद्योग, उत्पादन तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनासाठी एक मॉडेल आहे.
Comments are closed.