अवकाळी पावसातही अंधेरी सबवे पाण्याखाली; नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल




अवकाळी पावसातही अंधेरी सबवे पाण्याखाली मुंबईतील नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल


मुंबई : अंधेरी ते विरार दरम्यान आज (03 जून) सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगरात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला. मात्र आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली. कारण अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.



Comments are closed.