लुप्थान्साच्या विमानाला पार्किंगमध्ये अपघात, अनेक कर्मचारी जखमी
जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर गुरुवारी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोईंग 787 विमानाला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात लुप्थान्सा एअरलाईन्सचे काही कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावर उभ्या असलेल्या बोईंग 787-9 ड्रीमलाइनर विमानाचे नोज लँडिंग गिअर अनपेक्षितपणे आत ओढले गेल्यामुळे हा अपघात घडला.
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, डिपार्चर गेटवर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान
फ्रँकफर्टहून लॉस एंजेलिसला रवाना होणार होते. विमान लॉस एंजेलिसच्या प्रवासासाठी सज्ज होत असतानाच ही अनपेक्षित घटना घडली. अपघातावेळी विमानात केवळ क्रू मेंबर्स आणि ग्राउंड स्टाफ उपस्थित होते.
या घटनेत अनेक कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जखमींची नेमकी संख्या विमान कंपनीने तात्काळ जाहीर केली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत तपास सुरू आहे.
Comments are closed.