‘वस्त्रहरण’ नाटक पुन्हा रसिकांच्या भेटीला
कोकणातील नाटय़ परंपरा मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे दिग्गज अभिनेते मच्छिंद्र कांबळी (बाबूजी) यांचे रंगभूमीवर अत्यंत गाजलेलं नाटक ‘वस्त्रहरण’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचा 5336 वा प्रयोग 26 जुलै रोजी होणार असून मच्छिंद्र कांबळी यांनी अजरामर केलेली तात्या सरपंच यांची भूमिका वैभव मांगले साकारणार आहेत.
गंगाराम गव्हाणकर यांनी लिहिलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाचा पहिला प्रयोग 16 फेब्रुवारी 1980 रोजी रंगभूमीवर दाखल झाला. या नाटकाने बघता बघता नाटकाने गावागावात, घराघरात स्थान मिळवलं आणि प्रेक्षकांनी या नाटकाला तुफान प्रतिसाद दिला. भद्रकाली प्रॉडक्शन्सतर्फे हे नाटक ‘संगीत वस्त्रहरण’च्या नव्या रूपात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. आता प्रेक्षक या नव्याने सादर केल्या जाणाऱ्या अजरामर नाटकाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comments are closed.