टीएमसीचे माजी आमदार शौकत मोल्ला यांना अटक.

सोने बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएची कारवाई

वृत्तसंस्था/ कोलकाता

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी पश्चिम बंगालमधील भांगर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी, माजी टीएमसी आमदार शौकत मोल्ला याला अटक केली. मोल्ला हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. 19 मार्च रोजी 19 मार्च रोजी दक्षिण 24 परगणा जिह्यातील दक्षिण बामुनिया गावात कच्चा बॉम्ब बनवताना स्फोट झाला होता. या अपघातात बॉम्ब बनवणाऱ्याचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. तपासादरम्यान, एनआयएला मोल्लाने इतर आरोपींना बॉम्ब बनवण्याचे निर्देश दिल्याचे आढळून आले. स्फोटानंतर त्याने घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचे निर्देशही दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने अलीकडेच मोल्लाच्या घरासह अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

Comments are closed.