पतीसोबत राहूनही का वाढतोय महिलांमधील एकटेपणा?
करिअर, घर, मुलं सांभाळताना सध्या अनेक महिलांना पतीसोबत राहुनही भावनिक एकटेपणा जाणवत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. वरवर पाहता संसार सुखाचा आणि आनंदी वाटत असला तरी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली असल्याची अनेक कपल्समध्ये दिसून आले आहे. अनेक घरातील स्त्रिया या परिस्थितीतू जात असून त्या उघडपणे बोलणे टाळत आहेत.
वैवाहिक आयुष्यातील भावनिक पोकळी
तज्ज्ञांच्या मते हा भावनिक एकटेपणा निर्माण होण्यामागे संवादाचा अभाव हे कारण आहे. घरातील दैनंदिन जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण आणि नोकरी या सर्वांमुळे पती-पत्नीमधील ‘भावनिक संवाद’ संपत चालला आहे.
हेही वाचा – ‘या’ गोष्टी कोणाला न कळता स्वतः पुरत्याच ठेवलेल्या बऱ्या
अनेकदा स्त्रियांना वाटते की, घर चालवणे आणि कुटुंबाची काळजी घेणे म्हणजे संसार, पण त्यात स्वतःच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष होते. नात्यात आपुलकी, समजून घेण्याची वृत्ती आणि मोकळा संवाद यांचा अभाव असेल तर नाते फक्त नावापुरते उरते. हा भावनिक त्रास खोटा नसून तो एखाद्या आजाराप्रमाणे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकतो.
यावर उपाय काय?
- पती-पत्नीने रोजच्या धावपळीतून एकमेकांसाठी क्वालिटी टाइम काढायला हवा.
- जुन्या आठवणींना उजाळा द्यायला हवा.
- एकमेकांच्या आवडीनिवडी जपायला हव्यात.
- एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकायला हवे.
या साध्या गोष्टी कपल्सने लक्षात घेतल्या तर नात्यातील भावनिक बंद पुन्हा घट्ट करू शकता. यामुळे संसार केवळ एकाच छताखाली राहण्यापूरता राहणार नाही.
हेही वाचा – पती-पत्नी एकाच क्षेत्रात काम करत असल्याचे फायदे आणि तोटे
Comments are closed.