गांगुली, वॉटसन, एबी अन् श्रेयस आता ‘सुपर कोच’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्रिकेट प्रशिक्षणाच्या जगात मोठी क्रांती घडवण्याच्या निर्धाराने ‘कबुनी’ या एआय-आधारित क्रीडा विज्ञान मंचाने ‘प्लेटाइम 2026’मध्ये आपल्या जागतिक डिजिटल कोचिंग प्लॅटफॉर्मचे दमदार अनावरण केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोमेकॅनिक्स आणि परफॉर्मन्स डेटाच्या आधारे युवा क्रिकेटपटूंना वैयक्तिक आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा कंपनीचा दावा आहे.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमात माजी हिंदुस्थानी कर्णधार सौरभ गांगुली, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर यांना ‘सुपर कोच’ म्हणून जोडण्यात आले आहे. हे दिग्गज खेळाडू थेट युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणार आहेत.

कबुनीचे ‘प्लेओएस’ तंत्रज्ञान फलंदाजी आणि गोलंदाजीतील टायमिंग, संतुलन, पायांची हालचाल व शरीराची स्थिती यांचे रिअल-टाइम विश्लेषण करून तत्काळ अभिप्राय देते. त्यामुळे आतापर्यंत मोजक्या अकादमींपुरते मर्यादित असलेले अत्याधुनिक प्रशिक्षण आता सर्वसामान्य खेळाडूंपर्यंत पोहोचणार आहे. याचवेळी ‘डू यू वॉण्ट टू प्ले फॉर अ लेजेंड?’ या राष्ट्रीय मोहिमेचीही घोषणा करण्यात आली. 12 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना देशव्यापी निवड चाचण्यांमधून या दिग्गजांच्या संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

Comments are closed.