सूर्यकुमारला फलंदाज म्हणून संधी मिळायला हवी होती
टी-20 विश्वचषक जिंकून अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच सूर्यकुमार यादवला संघाबाहेर करण्याच्या निर्णयावर आर. अश्विन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फलंदाज म्हणून सूर्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसली तरी विश्वविजेतेपद मिळवून देणारा कर्णधार म्हणून त्याला आणखी वेळ द्यायला हवा होता, असे अश्विनचे मत आहे. देशाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराला कोणतीही अंतिम संधी न देता बाहेर केले जाणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. उद्या अशाच प्रकरणात हेच उदाहरण पुढे केली जाईल, असा इशारा देत अश्विन यांनी निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी सूर्याच्या जागी असतो तर मला नक्कीच अन्याय झाल्याची भावना आली असती, असेही त्याने स्पष्ट केले.
Comments are closed.