ताडदेव पोलीस कवायत मैदानावर ‘फिटनेस योगा’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात




ताडदेव पोलीस कवायत मैदानावर ‘फिटनेस योगा’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात


मुंबई : दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मानवी शरीर, मन आणि आत्म्याच्या आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ ही एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायाम आणि खेळांचा समावेश करून निरोगी राहावे, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधानांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला अनुसरून ताडदेव पोलीस कवायत मैदानावर ‘फिटनेस योगा’ जनजागृती कार्यक्रम आज (07 जून) उत्साहात पार पडला.



Comments are closed.