दादर प्लाझाजवळ झालेल्या अपघाताचे हादरवाणारे फोटो पाहा एका क्लिकवर




दादर प्लाझाजवळ झालेल्या अपघाताचे हादरवाणारे फोटो पाहा एका क्लिकवर


शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या दादर प्लाझा टॉकीजजवळ सोमवारी (8 जून) सकाळी मोठा अपघात झाला आहे. एका बेस्ट चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तीन जण जखमी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर या बसने तीन दुचाकी, एक चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये एक इलेक्ट्रिक दुचाकी थेट बसच्या खाली घुसली. या घटनेनंतर या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गोंधळ उडाला आणि या मार्गावर वाहनांची कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचे आणि अपघातग्रस्त बसला बाजूला करण्याचे काम सुरू केले.



Comments are closed.